जनतेज न्युज

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; संबंध ठेवत नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबादच्या सातारा पोलिसांनी अशाच एका टोळीला अटक केली. शहरातील सातारा आणि परिसरामध्ये एक 27 वर्षाचा इंजिनियर राहतो. एका तरुणीने त्याच्यासोबत जवळीक केली. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तोही एवढा गुंग झाला की त्याच्यावर लावलेला हा हनीट्रॅप आहे. याची त्याला जाणीवही झाली नाही. पुढे या प्रकरणात संजय जाधव नावाच्या व्यक्तीची इंट्री झाली आणि मग त्या इंजिनियर तरुणाला संजय जाधव आणि तरुणी कराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागले. पैशांची मागणी करू लागले. 19 डिसेंबर रोजी एका पांढ-या रंगाच्या कार मध्ये तुमच्या ऑफीसचे पार्सल आहे असे म्हणून भेटले. तिथे एक या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचला पीआय प्रदीप घुगे असल्याचं सांगत कार मध्ये बसायला सांगितलं. एका हॉटेलमध्ये जाऊन तरुणी, संजय जाधव, प्रतीक जाधव, अक्षय आणि नसीर पटेल यांने तिथे तरूणाला मारहाण केली. तरुणाच्या खिशात असलेले चाळीस हजार तीनशे रुपये हिसकावून घेतले. त्याच्या जवळ असलेली बुलेट गाडी हीसकावून घेतली आणि दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली.