जनतेज न्युज

स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी , नांदेड : लोहा तालुक्यातील बेटसावंगी गावामध्ये दलित वस्तीतील नागरिकांना पाणी रस्ते नाल्या सुविधा मिळत नसल्याने तेथील गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन मागणी केली आहे. की गेली साठ वर्षापासून आमच्यासाठी स्मशानभूमी नाहीये व कुठल्याच मूलभूत सुविधा मिळत नसून ते आम्हाला देण्यात याव्यात अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष माधव दादा जमदाडे यांनी दिला आहे.