जनतेज न्युज

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क

प्रतिनिधी , धुळे : सरत्या 2022 या वर्षाला निरोप देऊन 2023 या नवीन वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपायोजना राबविण्यात आल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या चालू असलेल्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत उत्साह पूर्ण वातावरणात करत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय राबविले जातात, गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणावर मध्याची तस्करी वाढली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धडक कारवाया करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध सीमा वरती भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अवैधमध्य तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.