जनतेज न्युज

युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह वृध्द कलावंतांनी केला रास्तारोको

प्रतिनिधी , बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वृध्द कलावंतांना मानधन दिले जाते, मात्र बुलढाणा जिल्ह्यात या वृध्द कलावंतांच्या निवड प्रक्रियेमध्ये घोळ झाला असल्याने अनेक पात्र कलावंत मानधनापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते ईश्वर चंदेल यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ कलावंतांनी बुलढाणा चिखली रोडवर येळगाव फाटावर रास्ता रोको केला आहे. यावेळी कलावंतांनी रस्त्यावरच जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी आणि विविध माध्यमातून आपली कला सादर केली. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हे सर्व कलावंतांना डिटेन केले.