प्रतिनिधी , धुळे : भीमा कोरेगाव विजय दिवस दोन दिवसांवर आला आहे त्यातच करणी सेनेचे अजय सेंगर यांनी काल प्रसार माध्यमांसमोर बोलताना भीमा कोरेगाव हा इतिहास खोटा आहे. पुणे येथील भीमा कोरेगाव स्तंभ हा राज्य सरकारने बुलडोझर लावून पडून टाकावा अन्यथा आम्ही बुलडोजर लावून स्तंभ पाडू असे बेताल वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यातील आंबेडकरी जनता पक्ष संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर हे त्यांच्या वक्तव्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा व दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर तात्काळ राज्य शासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या काळात ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने अजय सेंगर याला चोप दिला जाईल असे आव्हान धुळे जिल्हा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत अजय सेंगर यांच्या प्रतिमांचे दहन करून निषेध करण्यात आला.
