प्रतिनिधी , बीड : बीडच्या धारूर तालुक्यातील संगम येथे जन्मदात्या पित्याला मुलांनी घराबाहेर काढले आहे. दहा वर्षांपासून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करून माणिक रायकर आपला उदरनिर्वाह करतायत. आज ना उद्या आपल्या मुलांना मायेचा पाझर फुटेल आणि ते आपल्याला घरात घेतील, अशी अशा रायकर यांना होती. मात्र आज दहा वर्ष उलटले तरी देखील त्यांचा संघर्ष काही संपलेला नाही. त्यामुळे अखेर 61 वर्षीय माणिक रायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितलीय. रायकर यांनी पत्नी आणि मुलांबाबत वारंवार स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याची कसलीही दखल घेतलेली नाही. घराबाहेर काढून रायकर यांच्या नावे असलेली 9 एकर जमीन देखील मुलांनी नावावर करून घेतलीय. त्यामुळे आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही, असं म्हणत हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय.
