प्रतिनिधी , बीड : बीड तालुक्यातील पिंपळगाव मजरा शिवारात रब्बी पिकांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडलाय. शेतकरी सुशेन पडघन यांच्या हातातोंडाशी आलेलं ज्वारीचे पीक रानडुकरांनी फस्त केलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे पडघन यांनी ज्वारीचे पीक जपलं होतं. मात्र काढणीपूर्वीच बहुतांश पिक रानडुकरांनी उध्वस्त केलं. केवळ याच ठिकाणी नाही तर जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
