जनतेज न्युज

अज्ञातांनी केल डांगरच्या पिकाचे नुकसान; शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला

प्रतिनिधी , धुळे : शेतकरी आणि संकट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू झाले आहेत. ज्या ठिकाणी शेतकरी हा मेहनतीने आपले शेत सांभाळतो मात्र कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्याला संकटाचा सामना करावा लागत असतो. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाण्याअभावी शेतकऱ्याला संकटाचा सामना करावाच लागतो मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वरझडी गावात अज्ञातांनी डांगराच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे काढणीला आलेल्या डांगर पिकाचे अज्ञाताकडून नुकसान करण्यात आले आहे. शेतकरी सतीश अर्जुन पाटील यांनी एक एकर क्षेत्रात डांगर पिकाची लागवड केली होती. डांगर पीक काढणीच्या वेळेस गावातील अज्ञातांनी धारदार शस्त्राने सदर डांगर पिकांचे नुकसान केले असल्याचे नुकतेच समोर आले आहे. शेतकरी सतीश पाटील यांना २० ते २५ टन डांगर पिकाचे उत्पन्न येणार होते, त्यातून त्यांना ४ ते ५ लाख रुपयाची कमाई होणार होती. मात्र अज्ञानाने केलेल्या नुकसानामुळे त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतकरी असलेल्या सतीश पाटील यांनी आपल्या शेतामध्ये २० ते २५ टन डांगर लावून त्याची पोटच्या मुलापेक्षा अधिक काळजी घेतली होती. त्याला वाटले की, लवकरच आपल्याला या डांगर पिकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न भेटेल मात्र घडले असे की रात्री आपल्या शेतात पाहणी करून गेल्यानंतर सकाळी शेतात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर आले. २० ते २५ टन डांगरची अक्षरशः धारदार शास्त्राने मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी सतीश पाटील यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. हे नुकसान कोणी व का केले हे अद्याप समजू शकले नसले तरी शेतकरी सतीश पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, ज्या कोणी इसमाने हे प्रत्येक केले असेल त्याला तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी आणि महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सतीश अर्जुन पाटील यांनी केली आहे.