जनतेज न्युज

चोपडा साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधी , जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे सहा जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र शासकीय वेळेत दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 13 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणूक घेण्याची वेळ आली तर 12 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 13 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कारखान्यात एकूण 21 संचालक निवडणुकीतून निवडून द्यायचे आहे 15 संचालक ये ऊस उत्पादक गटातून येथील, अनुसूचित जाती जमाती मधून एक, महिला प्रवर्गातून दोन विमुक्ती जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक असे एकूण 21 संचालक आपण निवडून देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले.