प्रतिनिधी , अहमदनगर : आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडून करण्यात आला यावेळेस सर्व पत्रकारांना शाल श्रीफळ त्याच पद्धतीने एक नोटबुक व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व संगमनेरच्या पत्रकारितेला मोठा इतिहास असल्याचं यावेळेस दुर्गाताई तांबे यांनी सांगितलं संगमनेरचे पत्रकार हे विविध बाबींवरती आपलं लक्ष ठेवत असतात व चांगल्या वाईट गोष्टी ह्या जनतेसमोर आणीत असतात असं देखील दुर्गाताई तांबे यांनी सांगितलं आहे.
