जनतेज न्युज

कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा याकरिता आज खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद : विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या आणि आस्थापनेत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचार्‍यांची होत असलेली आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी, कामगार कायद्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ व हक्क मिळवून देण्यासाठी तसेच कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या सर्व संघटना, कामगार नेते व ज्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होत आहे. अशा सर्वांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.