जनतेज न्युज

कृषी जल्लोष महोत्सव व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन.

प्रतिनिधी , बुलडाणा : कृषी जल्लोष महोत्सव-२०२३ व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य-२०२३ जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल च्या मैदानावर आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. बुलढाणा नगरीत प्रथमच या कृषी जल्लोष जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवांना शेती संबंधित नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून आ. संजय गायकवाड, प्रमुख उपस्थिती अप्पर जिल्हाधिकारी गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक डाबरे,यांच्यासह कृषी महोत्सव समिती तथा कृषी विभागाची सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते..