जनतेज न्युज

कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्यांना बदडून काढण्या शिवाय पर्याय राहणार नाही – महेश खराडे

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस तोडिसाठी मुकादम , मजूर, चालक, स्लीप बॉय आणि मशीन मालक शेतकऱ्याची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत ही एक प्रकारची खंडणीच आहे त्यांना कारखान्याच्या शेती विभागाची साथ आहे त्यामुळे त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा अन्यथा कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्याना बदडून काढू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे ..

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यात उसाचे श्रेत्र सववा लाख हेक्टर आहे ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे मात्र नियमानुसार तोडणी साठी नाव आले तरी अकरी पाच ते दहा हजार रुपये, कोयत्याला मटण , चिकन, ड्रायवर ला 500 रुपये एंट्री दिली तरच ऊस तोडला जातो जो शेतकरी पैसे देत नाही त्याचा ऊस तोडला जात नाही तो पैसे वाला शेतकरी जास्तीचे पैसे देवून ऊस तोडून घेतो छोट्या पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना ना इलाजाने उस वारी करून तोडी साठी पैसे द्यावे लागत आहेत तीच अवस्था मशीन मालकाची आहे तेही शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे वसूल करत आहेत या सर्वांना कारखानदार , त्यांचा शेती अधिकारी , स्लीप बॉय याचीही साथ आहे त्यामुळे या सर्वावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आहे अन्यथा कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्यांना बदडून काढण्या शिवाय पर्याय राहणार नाही असे महेश खराडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी पुरावे तयार करावे शेतकऱ्यांनी पैसे मागताना मोबाईल रेकॉर्डिंग करावे तसेच पैसे देताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे म्हणजे पोलीस स्टेशन, कारखाना आणि साखर आयुक्तांच्या कडे तक्रार करताना हे पुरावे उपयोगी पडतील त्यामुळे शेतकऱ्यांनी ही थोडी हुशारी आणि सावध गिरी बाळगणे गरजेचे आहे मुकादम व मशीन मालकाचे नाव गाव वाहन नंबर , आदींची बिन चूक माहिती तक्रार करताना लागते त्यामुळे याचीही माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन खराडे यांनी केले आहे यावेळी प्रा अजित हलिगळे उपस्थित होते.