प्रतिनिधी , औरंगाबाद : शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी पिसादेवी परिसरातील हजारो नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती यावेळी शिवभक्तांनी शिवरायांच्या जयजयकार केला फटाक्यांची आताषबाजी करत बाईक रॅली काढत स्वागत केले ही मिरवणूक चिकलठाणा एमआयडीसी ओखार्ड मार्गे आंबेडकर चौक वैशाली ढाबा पिसादेवी येथे आल्यानंतर गावातील महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या काढून व पुष्प उधळून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत केले येणाऱ्या 19 फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ज्या ठिकाणी हा पुतळा बनवला होता तिथून या पुतळ्याचे आगमन पिसादेवी येथे होत आहे. महाराजांच्या पुतळ्याचं आगमनाची स्वागत मोठ्या जल्लोष्यात करत असल्याचे माजी आमदार कल्याण काळे यांनी म्हटले आहे.
