जनतेज न्युज

सिल्लोड येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला सुरुवात

प्रतिनिधी , औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे सिल्लोड महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत आज सिल्लोड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय जंगी शंकर पटाला सुरुवात झाली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शंकर पटाचे उद्घाटन झाले. आज आणि उद्या असे दोन दिवस शंकर पट असणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यातील बैल जोडी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अनेक दिवसानंतर सिल्लोड येथे जंगी शंकरपट होत असल्याने शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड संख्येने उपस्थिती पहायला मिळत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी शेतकरी व आलेल्या जनावरांसाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले आहेत.