जनतेज न्युज

बुलढाणा पोलिसांनी तोतया पोलीस अधिकाऱ्याला गोंदियातुन घेतले ताब्यात

प्रतिनिधी , बुलडाणा : अनेकांना फोन लावून धमकी देत देणाऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने गोंदिया येथून ताब्यात घेतले असून त्याला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले आहे..बुलढाणा एलसीबी मधून पीएसआय कदम बोलतो अशी बतावणी करत या भामट्याने पोलीस पाटील, पत्रकार तसेच पोलिसांना सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत. याप्रकरणी धाड आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आदखलपात्र स्वरूपाची तक्रार सुद्धा दाखल आहे. फोन द्वारे अधिकारी असल्याची बतावणी करत या भामट्याने काहींना लाखो रुपयांचा चुना सुद्धा लावलेला आहे.. सदर भामटा गोंदियात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांच्या एका पथकाने गोंदियाला जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.24 वर्षीय किशोर ससाने असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून तो देडगाव, तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे..या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.