जनतेज न्युज

महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहा किंवा दहा टक्के – गिरीश महाजन

प्रतिनिधी, मुंबई : महानगरपालीकेत दहा टक्के किंवा दहा अशी स्वीकृत नगरसेवक असा निर्णय घेतलाय 150 सदस्य आहेत त्या ठिकाणी 10 सदस्य आणि ज्या ठिकाणी 74 सदस्य आहेत त्या ठिकाणी 10 टक्के सदस्य निवडले जातील महानगरपालिकेची सदस्य संख्या बघून दहा की दहा टक्के याचा निर्णय होईल. असे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटंले आहे.  तसेच अजित पवार यांना बोलायचा अधिकार नाही. तुम्ही कुणाच्या कारवाई बद्दल बोलतात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबत बोलतात का? त्यांनी काहीच केलं नाही असे म्हणायचे आहे का? पुराव्या शिवाय कुणालाही तपास यंत्रणा आत टाकत नाहीआपले सरकार असताना आपण कुणावर काय काय करवाई केली. असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल विचारल असता गिरीश महाजन बोलले की संजय राऊत यांच्या म्हणण्याला कुणी फार महत्व देत नाहीत त्यांच्या वक्तव्यावर फार गंभीर बघत नाही संजय राऊत सकाळी 9 वाजता सुरू होतात ते रात्रीपर्यत सुरू होतात त्यांना जर वाटत असेल सरकार पडेल तर त्यांनी प्रयत्न करायला हवा. असे गिरीश महाजन यांनी म्हटंले आहे.