जनतेज न्युज

जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी सुरू, लाखोंचा जनसमुदाय येणार

प्रतिनिधी, बुलडाणा : राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे त्यांच्या जन्म गावी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मराठा सेवा संघ आणि त्यांच्या इतर सर्व कक्षांच्या वतीने ११ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन केले जाते, या जन्मोत्सवासाठी देशभरातून जिजाऊ प्रेमी मोठ्या संख्येने दाखल होत असतात, या वर्षी देखील लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी येणार असल्याने आयोजन समितीने जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. दरवर्षी या ठिकाणी साहित्याची एक प्रकारे मेजवानीच वाचकांना मिळत असते, त्या अनुषंगाने यावर्षी देखील पुस्तकाचे ४०० स्टॉल तर भोजनाचे शंभर स्टॉल लावण्यात येणार आहेत.या जन्मोत्सवासाठी नाना पटोले, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे हे येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर सर्वच पक्षांच्या मोठ्या नेत्यांना आयोजन समितीकडून निमंत्रित करण्यात आले आहे.