जनतेज न्युज

एका पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होतेय – पीडित मुलीचे वडील

प्रतिनिधी, औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी शहरात एसिपी असलेल्या पोलीस आरोपीने महिलेची छेड काढल्या प्रकरणी पोलीस खात्यात खळबळ उडाली होती. आज त्या अनुषंगाने नारळी बाग येथील रहिवाशी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी गेले असता पिडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करते पण अशा एका पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सर्व पोलिसांची बदनामी होते. या गोष्टीचा मला प्रचंड त्रास होतोय आणि असा नालायक थडकलास अधिकारी आमच्या घरात येऊन धुमाकूळ घालतोय धडाधड मारतोय ज्या आईने जन्म दिला त्याला त्याचे भान नाही ज्या सामाजाने मान दिले ज्या पदाने मान दिला याचं सुद्धा भान नाही अशा थडकलास अधिकारी इथे लादल्या जातोय तिथे कर्मचारी अधिकारी यांना माहित नाही का साधारण पोलीस बँकेत लोन करायचं तर तुमचं काय रेकॉर्ड आहे. ते काढा रेकॉर्ड खराब असल्याने लोन भेटत नाही ड्रायव्हिंग लायसन भेटत नाही पण ह्या माणसाचं अहमदनगर नागपूर मध्ये इतर ठिकाणी असे प्रकार झालेले असताना सुद्धा पोलीस प्रशासनाच्या लक्षात येत नाही का अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली