प्रतिनिधी, बीड : रोज सकाळी 9 वाजता दिल्लीत आणि मुंबईत बसून कोण पोपटपंची करतं? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे खरा पोपट लाल कोण? हे जनतेला सांगण्याची गरज नाही. असं म्हणत भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ज्यांच्या डोळ्याने तारक मेहता का उलटा चष्मा घातलेला त्यांना सार उलटच दिसतं अशा शब्दात कुलकर्णी यांनी खासदार संजय राऊतांवर पलटवार केलाय.
