जनतेज न्युज

चंद्रपूरच्या नागरिकांनी अनुभवली आकाशातील स्काय ट्रेन

प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरच्या आकाशात नागरिकांनी अनुभवली स्काय ट्रेन, एलोन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन संध्याकाळी आकाशात दिसू लागल्याने खगोल अभ्यासकांमध्ये कुतुहलचंद्रपुरात संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलोन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे. भक्कम इंटरनेट जोडणी साठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईट ची एक ट्रेन सोडण्यात आली असून तीच चंद्रपूरच्या आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. आकाशात अशा प्रकारे ही स्कायट्रेन भविष्यात अनेकदा दिसू शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे