जनतेज न्युज

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून धीरज लिंगाडेंच्या विजयाचा फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष

प्रतिनिधी, बुलडाणा : अमरावती पदवीधर मतदार संघात दोन टर्म आमदार राहिलेले माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांना पराभूत करून विजयाच्या उभंरठ्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे उभे आहेतकाँग्रेसचे धीरज लिंगाडे 2313 मतांनी आघाडीवर आहेत.धीरज लिंगाडे यांना 43 हजार 340 तर रणजीत पाटील यांना 41 हजार 27 मतं मिळाली आहेत.याच अनुषंगाने बुलढाण्यात महाविकास आघाडींच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील जस्तंभ चौकात धीरज लिंगाडे यांच्या विजयाचा फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.