जनतेज न्युज

सकल मराठा समाजाचा जल्लोष ; ३३६ जणांना मिळाली नियुक्तीपत्रे

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ३३६ तरुणांना राज्य परिवहन महामंडळातील चालक आणि वाहक पदावरील नियुक्तीची पत्रे मिळाली. या निर्णयाचे सकल मराठा समाजाने रात्री उशिरा स्वागत करीत जल्लोष केला. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर तरुणांना नियुक्तीपत्रे मिळाली. ही नियुक्तीपत्रे मिळाली नसती तर पुन्हा मोलमुजरी करावी लागली असती, अशा भावना अनेक तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. कधी आरक्षण तर कधी कागदपत्रांची पडताळणी या नावाखाली नियुक्तीपत्रे रखडली होती.या प्रश्नावर सकल मराठा समाजाने आंदोलन केले होते. अखेर चार टप्प्यांत यातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे काम सुरु झाले. या निर्णयाचे स्वागत करीत सकलमराठा समाजाने जल्लोष केला.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत हलग्या लावून,फटाके फोडत, पेढे वाटून आनंद व्यक्त केला.