जनतेज न्युज

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्ते आक्रमक

प्रतिनिधी, नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नागपूरात उमटले. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चा च्या कार्यकर्तां ने जितेंद्र आव्हाड यांचा विरोधात नारे बाजी करत आंदोलन केले. युवा मोर्च्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा प्रतिकात्म पुतळा जाळला व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या वक्तव्यवर स्पष्टीकरण द्यावं अशी ही मागणी केली..