प्रतिनिधी, अमरावती : खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळ येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. या ठिकाणी पर्जन्यमान यंत्र खराब झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा निकष काढण्यात आला होता. त्यामुळे वरखेड मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आतापर्यंत अनेकदा आंदोलन करून सुद्धा न्याय मिळाला नाही. तसेच विमा धारक शेतकऱ्यांना त्वरित मोहबला मिळण्यात यावा व तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
