जनतेज न्युज

सांगली जिल्ह्यातील मिरज मधील राष्ट्रवादीच्या नेत्यां मधील वाद चव्हाट्यावर

प्रतिनिधी, सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज मधील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मधील अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आली आणि गंभीर आरोप एकमेकांवर करण्यात आले. सुरुवातीला अंतर्गत असणारा संघर्ष आता वैयक्तिक टीकेवर येवून थांबला आहे. राष्ट्रवादी मधील मातंग बौद्ध महार समाजातील नेत्यांना डावलल जात असा आरोप एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी मधील नेत्यांनी पलटवार केला. मात्र पत्रकार परिषद घेण्या अगोदर राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्यात मोबाईलवर संवाद झाला होता. डॉ. महेश कुमार कांबळे यांची एक प्रकारे परवानगी घेऊनच प्रमोद इनामदार यांनी पत्रकारांच्या समोर आपली बाजू मांडली. इनामदार मात्र फोनवर एक बोलले आणि टीका मात्र वेगळीच केली. त्यानंतर या दोन नेत्यांच्या मधील मोबाईल वरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जातीवादी नेमकं कोण आहे ? आणि कोणा कोणाला डावलल जात, अशा आशयाचे विषय रेकॉर्डिंग मध्ये असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.