प्रतिनिधी, जळगाव : चोपडा शहरातील मेन रोडवर असलेले राहुल एम्पोरियम या तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागल्याने या आगीमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी चोपडा नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासन सामाजिक कार्यकर्ते यांनी शर्तीचे प्रयत्न केले व चोपडा अमळनेर धरणगाव जळगाव यावल शिरपूर इथून अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. आग इतकी भीषण होती की अग्निशामक जवानांना आग विझवण्यासाठी शेर्तीचे प्रयत्न करावे लागले. या बिल्डिंगमध्ये आग लागल्याने सदर युवक याने कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढण्यासाठी स्वतः मदत केली. परंतु दुर्दैवाने हा युवक वरतीच राहिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर आग विजवण्यासाठी जवळपास चार ते पाच तास लागले. या आग विझवण्यात नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला हातावर जखमा झाल्याचे दिसून येत होते. या आगीमुळे या बिल्डिंग मधले संसार उपयोगी वस्तूं सह मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या भीषण आगीचे कारण समजू शकले
