जनतेज न्युज

भाजप आमदार समीर कुणावार यांनी जिल्ह्याच्या टोकावरील कोल्ही शाळेला दिली भेट

प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यातील  हिंगणघाट तालुक्यातील सर्वात शेवटचे व जिल्ह्याच्या टोकावरील गाव म्हणून ओळख असलेले कोल्ही गाव तेथील शिक्षक परमेश्वर नरवटे व दिपाली सावंत यांच्या कार्याने नावारुपास आलेली कोल्हीची शाळा. येथील शाळेत अचानक भाजप आमदार समीर कुणावार यांनी आज  भेट दिली.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे डाव्या आणि उजव्या हाताने लेखन करताना पाहून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व ही वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचा अभिप्राय दिला. आमदार विद्यार्थ्यांसोबत रमले आणि त्यांचे उपक्रम समजून घेतले. ज्ञानरचनावाद समजून घेतला  शाळेतील डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करून मुलांना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी झटत असलेले शिक्षक परमेश्वर नरवटे व दिपाली सावंत यांनी अपार मेहनत घेत मागील चार वर्षात शाळेचा पट दुपटीने वाढविला आहे.  शिक्षकांनी कोल्ही शाळेसारखी शाळा बनविण्याचा प्रयत्न करावा अशी प्रतिक्रिया आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली.