जनतेज न्युज

विद्यार्थ्यांच्या अडचणी झाल्या दूर;बुलढाणा आगाराला मिळाल्या पहिल्या टप्प्यात दहा एसटी बस

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा आगाराला एसटी बस संख्या कमी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे नुकसान होत होते.  या बाबत विद्यार्थ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असता आमदार संजय गायकवाड यांनी  बुलढाण्याला चाळीस एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी एसटी विभागाचे महाव्यवस्थापक शेखर चने यांच्याकडे केली होती. या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात बुलढाण्याला  पहिल्या टप्यात 10 एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सायंकाळी संजय गायकवाड यांनी एस.टी बसला हिरवी झेंडी दिली आहे.बुलढाणा आगाराची अवस्था खूपच बिकट अशी होती.बुलढाणा आगारास 110 गाड्या मंजूर असताना केवळ 58 गाड्या कार्यरत असल्याची महिती आहे.. त्‍यातही अनेक नादुरुस्त आहेत. त्‍यामुळे  ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी शाळेत येण्यासाठी अनेक  अडचण येते होत्‍या.  ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबास एसटी हाच मोठा आधार वाटतो. तर एसटी विभागाकडे वाढीव बसेस नसल्याने  फेऱ्यांचे संख्या मर्यादित झाली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात याचा फटका सर्वाधिक विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. .याबाबत पालक वर्गातून फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती.आमदार संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता, त्‍यांनी मुंबई येथे राज्याच्या आगार व्यवस्थापक प्रशासनाची भेट घेऊन बुलडाण्याला 40  बसेस मंजूर करून घेतल्या आहेत.आमदार संजय गायकवाड यांनी यातील 40 एसटी बससे जिल्हयासाठी देण्याची मागणी केली आहे.. या मागणीला आज पहिल्या टप्यातील 10 एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी सदर एसटी बस चे उद्‌घाटन करीत हिरवी झेंडी दिली आहे.