प्रतिनिधी, नागपुर : जेव्हा पायाखालची वाळू सरकते… तेव्हा असे आरोप होऊ लागतात… मात्र, हे आरोप भाजपवर नाही आहे.. तर हे आरोप मतदारांवर आहे की मतदार पैसे घेऊन मतदान करतात.. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठला ही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही.. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही.. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही.. मतदारच आम्हाला वारंवार जिंकून देतात.. कसबा आणि चिंचवड मध्ये आम्ही जिंकणार आहोत.. हे माहीत पडल्यानंतर असा रडीचा डाव सुरू झालेला आहे… कसबा मध्ये आचारसंहितेचा खुलं उल्लंघन करण्यात आला आहे.. जे सांगायचंय ते मीच सांगितलं आहे.. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते.. त्याची योग्य वेळ असते.. योग्य वेळी सांगू सगळ्या गोष्टी.. काही लोकांना असं वाटते की सर्व काही त्यांच्याच काळातला आहे.. त्यांचा काळ अडीच वर्षाचा होता. अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष ते दाराचे आत होते.. त्यामुळे त्यांना जे काही दोन अडीच महिने मिळाले त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल असे त्यांना वाटते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातील आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला, तर धाराशिव हे नाव उस्मानाबादला दिलं आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले. ते केंद्राने मान्य केले.आम्ही नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कदाचित आदित्य ठाकरे असेही म्हणू शकतात की त्यांच्या सांगण्यामुळेच मोदींनी हे प्रस्ताव मान्य केले..
