जनतेज न्युज

ट्रॅक्टर पलटी झाल्याने विद्यार्थ्यांचा अपघात 20 ते 25 ते विद्यार्थी जखमी

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जेडी पाटील सांगलुटकेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचे  शिबिर आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने अपघात झाला यात पंचवीस च्या वर विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत एका विद्यार्थ्याला नागपूरला देखील हलवण्यात आलेले आहे. जैनपूर  येथे काल राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप झाला व त्यानंतर विद्यार्थिनींना खाजगी वाहनाने तर उर्वरित 40 ते 45 विद्यार्थी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसवून दर्यापूर कडे निघाले होते याच दरम्यान ट्रॅक्टर भरधव वेगात असल्याने वळणावर वाहन चालकाचे संतुलन बिघडल्याने अपघात झाला. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात व काही विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात तर एका विद्यार्थ्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.   विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर राबवले जाते मात्र विद्यार्थ्यांची चांगली व्यवस्था करण्याचे काम हे कॉलेज प्रशासनाच आहे मात्र या कॉलेज प्रशासनाने कुठेतरी हलगर्जीपणा केल्याचं दिसत आहे. परत येताना एकच ट्रॅक्टर ट्रॉलीत  46 विद्यार्थी कोंबून विद्यार्थ्यांना आणले जात होते असे जखमी विद्यार्थ्यांनी सांगितलंया अपघातात जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र  विद्यार्थ्यांना परत आणत असताना ट्रॅक्टरची व्यवस्था केल्याने पालक संतप्त झाले व यापुढे तरी महाविद्यालयाने काळजी घ्यावी अशी विनंती केली. पालकांनी  केली.आहे.