जनतेज न्युज

कोरेगाव पार्क मधील देशी विदेशी महिलांचा देह व्यापार थांबणार तरी कधी ? विक्रम …विक्रम…. विक्रम… वेताळ?

प्रतिनिधी, पुणे : विजय लोणके/आंतरराष्ट्रीय स्तरावर ओशो रजनीश आश्रम आणि कोरेगाव पार्क यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज त्याच कोरेगाव पार्क मध्ये देशी विदेशी महिलांचा देह व्यापार कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या नाकाखाली सुरू असताना पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील दोन महिन्यात सुमारे 11 वेळा कारवाई करून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील महिलांचा देह व्यापार व रात्री अपरात्री सुरू असलेले हॉटेल लॉजेस यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काल शनिवारी देखील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील एका पा मसाज पार्लरवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून देश विदेशातील महिलांकरवी देह व्यापार करणाऱ्या चार विदेशी व तीन देशी महिलांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केल्याची बाब पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रेस विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.प्रकरणी स्पा मॅनेजर उत्तम शेषेराव सोनकांबळे  (38, रा. खराडी) आणि स्पा चालक गजानन दत्ता आडे यांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून मॅनेजर उत्तम सोनकांबळे याला अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोडवरील विद्युतनगर सोसायटीच्या प्लॉट नं. 2 येथील द सिग्नेचर थाई स्पा सेंटरमध्ये मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या  सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरील स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवुन खात्री करण्यात आली. त्यानंतर तेथे तात्काळ छापा टाकला. त्यावेळी 4 परदेशी आणि 3 भारतीय अशा एकुण 7 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरा फरार आहे. दोघांविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुण्या एकेकाळी दूरदर्शन वर विक्रम आणि वेताळ यांच्या सिरीयल दाखवल्या जात होत्या. आज कोरेगाव पार्कमध्ये विक्रम ….विक्रम… विक्रम …वेताळ ….वेताळ ?असा सिरीयल नव्हे तर सिरीयस असा शो सुरू आहे . कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन चा पदभार श्री विनायक वेताळ यांनी स्वीकारल्यापासून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत बेसुमार महिलांचा ध्येय- व्यापार सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ड्रग्स व्यापार देखील सुरू झाल्याचे अनेक प्रकरणावरून दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेचा सहभाग आहे किंवा कसे याविषयी शंका उपस्थित होत आहे. म्हणून शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग व इतर गुन्हे शाखांनी आजपर्यंत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली नव्हती परंतु सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी मागील दोन महिन्यांमध्ये कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 11 वेळा कारवाई केल्याची बाब दिसून आले आहे. या सर्व प्रकारास कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी जबाबदार असल्याची बाब दिसून येत आहे. कारवाई एकावर गुन्हा दुसऱ्यावर-सामाजिक सुरक्षा विभाग पुणे शाखा यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यात अकरा वेळेस कारवाई करण्यात आल्याची बाब पुणे शहर पोलीस आयुक्तालय कडील प्रेस रूम मधून उघड झाली आहे. दरम्यान आमच्या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने देह व्यापार सेंटरवर कारवाई केल्यानंतर पकडून आणलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्याचे जबाबदारी पोलीस स्टेशनचे असताना देखील वस्तुस्थिती वेगळी असल्याची बाब दिसून आली आहे .थोडक्यात सामाजिक सुरक्षा विभाग यांनी पकडलेले आरोपी आणि पोलीस स्टेशन यांच्याकडून दाखल करण्यात आलेले पुण्यातील आरोपी हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्याचे बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.(क्रमशः)