जनतेज न्युज

मोक्का गुन्ह्यात पोलीसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस खडक पोलीसांनी केले जेरबंद भाईगिरीची नशा, नागरीकांना मारतो ढुश्या, कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना खडक पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

प्रतिनिधी , पुणे : विजय लोणके, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत, हातातील कोयते, तलवारी हातात फिरवुन नागरीकांत दहशत निर्माण करून, भाईगिरीची नशा चढलेल्या व पोलीसांना गुंगारा देऊन पळ काढणाऱ्या भाईची नशा खडक पोलीसांनी उतरविली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टिमने उत्तम कामगिरी बजावली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार नातुबाग, शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे येथे गेले असताना फिर्यादी यांचे तोंडओळखीचा मंदार खंडागळे याने फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवून, फिर्यादीस “आमचा भाई जंगळ्या सातपुते हा जेलमधुन सुटला आहे. त्याने मला तुझ्याकडुन चाळीस हजार रुपये घेवुन ये असे सांगीतले आहे. असे म्हणून फिर्यादी यांचेकडे खंडणीची मागणी केली. परंतु फिर्यादी यांनी त्यांस पैसे देण्यास नकार दिला याचा राग आल्याने मंदार खंडागळेने फिर्यादीस “ तुला अर्ध्या तासात बघुन घेतो“ अशी धमकी देवून तेथून निघुन जावुन फिर्यादी व त्यांचे साथीदार हे घरी जात असताना डायमंड मित्र मंडळ, गंजपेठ, पुणे येथे आले व फिर्यादी हे यातील आरोपी उमेश वाघमारे यांचे वडीलांशी व कुमार लोंढे यांचेशी बोलत असताना उमेश वाघमारे हा तेथे आला व फिर्यादीस “ तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ?“ अशी विचारणा करुन “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्माण करणेसाठी “ माझे मध्ये कोण येतो ते मी बघतो. आता तुला खल्लास करतो“ असे ओरडुन फिर्यादीचा जीव घेण्याचे उद्देशाने फिर्यादीचे डोक्यात खोरे मारले. त्याचवेळी आरोपी नामे आदित्य ऊर्फ भुडया बनसोडे हा तेथे कोयता घेवून आला व त्याने देखील फिर्यादी यांना उद्देशून “याला सोडु नका मारून टाका“ असे म्हणून कोयता उमेश वाघमारेकडे दिला उमेश वाघमारे याने तो कोयता फिर्यादी यांचा जिव घेण्याचे उद्देशाने डोक्यात मारला त्यावेळी उमेश वाघमारे याचे साथीदार यातील आरोपी कुमार लोंढे याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीस फेकुन मारला, विनायक शिंदे, मंदार खंडागळे यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, गणेश शिकदार ऊर्फ परदेशी यांनी फिर्यादीस लोखंडी रॉड, आदित्य बनसोडे याने फिर्यादीचे पायावर लाकडी बांबुने मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच सदर भागात आपले हातातील हत्यारे उंचावुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली वगैरे मजकुरची तक्रार दिल्याने खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक 341/2022 भा.द.वि.क. 307,387,341, 143,144, 147, 148, 149, 506, भा.ह.का.क. 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135, क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट कलम 7, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1), 3(2), 3(1) अन्वये नोंद आहे. गुन्हयाचा तपास श्री सतीश गोवेकर, मा. सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग हे करीत आहेत.
वरीलप्रमाणे दाखल गुन्हयात एकुण 05 आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आले होते. यातील पाहीजे आरोपी कुमार रमेश लोंढे हा गुन्हा दाखल दिनांकापासून अटक चुकविण्यासाठी फरार होता. नमुद आरोपी तब्बल तिन महीन्यापासून अटक चुकविण्यासाठी फरार असल्याने त्याचा शोध होण्याकरीता श्री. सतीश गोवेकर, मा. सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांनी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती संगिता यादव यांचे अधिपत्याखालील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते.
त्यानुसार ‘खडक पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी स.पो.नि. राकेश जाधव, अमलदार संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बावळे अशा पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपास पथकातील अंमलदार संदिप तळेकर,मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बाबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की पाहीजे आरोपी कुमार लोंढे हा त्याचे नातेवाइकांना भेटण्यासाठी संतोषी माता मंदिर, कात्रज येथे येणार असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या बामतीनुसार तात्काळ स.पो.नि. जाधव व अंमलदार संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार चाबळे, निवेदीता कोंढाळकर अशा पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन पाहीजे आरोपी कुमार लोंढे यास ताब्यात घेतले व पुढिल कार्यवाहीसाठी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे समक्ष हजर केले.
वरील नमुद कारवाई श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे व श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगिता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, व पोलीस अंमलदार महेश कुताळ, संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बाबळे, विशाल जाधव, रफिक नदाफ, लखन डावरे, नितीन जाधव, महेश जाधव, राणी जाधव, निवेदीता कोंढाळकर यांचे पथकाने केली आहे.