जनतेज न्युज

वर्तकनगर परिसरात सुरु असणाऱ्या बांधकाम साईट वरुन दोन गट आमनेसामने

प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील वर्तक नगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईट वरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक गट आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के गट पुन्हा एकदा आपापसात भिडले आहेत. वर्तक नगर प्रभाग समिती समोरील बिर्ला कंपनी येथील बांधकाम कंत्राट वरून या दोन्ही गटांमध्ये अनेक महिन्यापासून वाद सुरू आहेत. आज या बांधकाम साईट वरून काही डंपर जात आतांना सरनाईक गटाच्या काही लोकांनी ते अडवले आणि डंपर ची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यात डंपर च्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. यावेळी मोठा जमाव जमून काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र , तात्काळ पोलीसांनी दोन्ही गटाला शांत केले असून सध्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी करून हा वाद मिटवावा अशी मागणी करण्यात येत आहे.