जनतेज न्युज

कोल्हापूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून एका आंतरराज्य टोळीला केले जेरबंद

प्रतिनिधी, कोहलपुर : कोल्हापूर जिल्ह्यात जबरी चोऱ्या करणाऱ्या आणि घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केलेली आहे. पोलिसांनी एकूण ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३६ गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. तर ३५ लाख ८३ हजार रुपये किंमताचा मुद्देमाल जप्त केला आहे.- कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी आणि जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यावर गांभीर रित्या लक्ष देत कोल्हापूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून एका आंतरराज्य टोळीच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत. जळगाव हुबळी परिसरात राहणाऱ्या या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून १३१ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीची पल्सर मोटर सायकल, एक बेकायदेशीर ९ एम एम पिस्टल चे २४  जिवंत राऊंड आणि एक मॅक्झिन, एक क्रेटा कार, एक एक्सेस दुचाकी असे एकूण ३५ लाख ८३  हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले पाचही गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या वरील एकूण ३६ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत.  पोलिसांनी अटक केलेल्या या पाचही आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.