जनतेज न्युज

पार्किंग मधून गाड्या चोरणारे अखेर पोलीसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, मुंबई :  पार्किंग मध्ये किंवा रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहने डुप्लीकेट चावी आणि ऑनलाईन टूल्सच्या आधारे गाड्या चालू करून त्या चोरून नेल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मागील महिन्यातील दोन तक्रारी वरून तपास सुरू केला. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात कुर्ला येथे एका चोरी झालेल्या गाडीचा तपास लागला. त्यात पोलिसांना काही संशयित सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनीच या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेल्या 70 लाख रुपये किंमतीच्या एकूण 15 वेगवेगळ्या कंपनीच्या कार हस्तगत केल्या असून, त्यांच्यावर नवी मुंबई सह मुंबई मध्ये एकूण 15 गुन्ह्यांची उकल झाली आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस करत आहेत.