प्रतिनिधी, अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे २० मे रोजी घडलेल्या पेपर फुटीप्रकरणात बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषद मध्ये बोलत होते जो कोणी दोषी असेल किव्हा भाजपचे पदाधिकारी असो यांची सखोल चौकशी व्हावी. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर अजामीनपत्र गुन्हा दाखल असताना, अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणातील तीनही आरोपी भाजपचे पदाधिकारी असल्याने राजकीय दबावातून त्यांना सोडण्यात आल्याचे युवक कॉँग्रेसचे म्हणने आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची सखोल चैकशी करण्याची मागणी युवक कॉँग्रेस च्या वतीने पत्रकार परिषद मध्ये केली आहे.
