जनतेज न्युज

खरंच यंत्रणांनी आमचं ऐकलं असतं तर संजय राऊतला अंडा सेलमध्ये टाकल असतं – संजय शिरसाट

प्रतिनिधी, संभाजीनगर : काही लोकांचा असा समज झाला आहे की ईडी, सीबीआय या संस्था राजकीय लोक चालवत आहेत. परंतु याचा जर वापर करायचा असता तर अनेक लोक तुरुंगात दिसले असते. बाहेर दिसलेच नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर हा संजय राऊत भोंग्यासारखी बडबड करत आहे. आमची इच्छा असती आणि एजन्सी जर तसं वागायला लागली असती तर संजय राऊत याला अंडा सेलमध्येच टाकला असतं अशी जहरी टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली. संजय शिरसाट हे मुंबई येथून छत्रपती संभाजी नगर येथे आले यावेळी जयंत पाटील यांच्यावर ईडीच्या कारवाई संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, तीन-चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस येणं नवीन भाग नाही. शरद पवार राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना देखील ईडीच्या नोटीस आल्याच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी हे नेते ईडी या कार्यालयात गेले होते. या संदर्भात राज्यात एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे एखाद्याला ईडीची नोटीस आली की तो शक्ती प्रदर्शन करतो. यातून एखाद्या संस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे बरोबर नाही. ईडीची नोटीस आली म्हणजे शिक्षा होते असे नाही त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली तर शिक्षा द्यायची की नाही हे कार्यालय ठरवतात. हे जर खरं असतं तर अनेक लोक तुरुंगात असते बाहेर दिसलेच नसते असे संजय शिरसाट म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, परंतु काही लोकांचा असा समज झाला आहे की ईडी, सीबीआय या संस्था राजकीय लोक चालवत आहेत. परंतु याचा जर वापर करायचा असता तर अनेक लोक तुरुंगात दिसले असते. बाहेर दिसलेच नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर हा संजय राऊत भोंग्यासारखी बडबड करतोय. आमची इच्छा असती आणि एजन्सी जर तसं वागायला लागली असती तर संजय राऊत याला अंडा सेलमध्येच टाकला असतं. परंतु तसं झालंय का आजही संजय राऊत बाहेर आहे. राज ठाकरे यांनी कार्यालयात जाऊन दहा तास नोटिसीला उत्तर दिलं यामुळे असं म्हणणं गैर आहे. असे करत राहिल्यास एखाद्या नेत्याने भ्रष्टाचार केला आहे हे म्हणणे देखील आपल्याला शक्य होणार नाही, असा सल्ला देखील संजय शिरसाट यांनी दिला.  उद्धव ठाकरे आता पदं पैसे घेऊन विकली जात आहेत. काही लोकांनी स्वत:ची दुकानदारी मांडली आहे. इथे दलाल निर्माण झाले आहेत. पैसे द्या आणि निवडणूकीचं तिकीट घ्या अशी परिस्थिती सध्या आहे, असा गंभीर आरोप शिरसाटांनी केला आहे.