प्रतिनिधी, कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात मनसेने धडक दिली. यावेळी फेरीवाल्यांना हुसकावण्यात देण्यात आले. त्यांचा माल फेकून देण्यात आला. तर स्टेशन मास्तरांना बांगड्या भेट म्हणून देण्यात आल्या. याच कारण म्हणजे सोमवारी सकाळी एका तरुणीची कल्याण रेल्वे स्थानकात छेड काढण्यात आली. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच स्थानक परीसरात असलेले भिकारी ,फेरीवालेआणि मद्यपी,गर्दुल्ले यांच्या विषयाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या घटनेमुळे मनसेन आक्रमक पवित्रा घेत स्टेशन गाठलं. यावेळी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात ठिय्या मांडण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरांना बांगड्या भेट देत आपला संताप व्यक्त केला. अशा घटना टाळण्यासाठी स्टेशन परीसर मोकळा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर मनसेला लेखी हमी देण्यात आली. 15 दिवसात यावर योग्य ती कारवाई होईल असं प्रशासनाने सांगितलं. त्यामुळे मनसेने ठिय्या आंदोलन मागे घेतल. मात्र 16 व्या दिवशी परिस्थिती तशीच असली तर ऍक्शन मोडमध्ये येत मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा इशाराच देण्यात आला..
