जनतेज न्युज

तृतीय वर्ष संघ शिक्षा – वर्गाच्या वतीने नागपूर शहरात पथसंचलन

प्रतिनिधी, नागपुर : तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या सहभागींनी नागपूर शहरात पथसंचलन केले. आज संध्याकाळी संपूर्ण गणवेशात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. तृतीय शिक्षा वर्ग शिबिर 8 मे पासून सुरु झाला असून  देशभरातील 682 निवडक स्वयंसेवकांचा 25 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आल आहे, या पथसंचलनात सहभागी बँड पथकासह रांगेत चालताना स्वयंसेवक दिसले. पथसंचलन नागपुरातील रेशमबागच्या हेगडेवार स्मृती मंदिरातून निघून नागपुरातील अनेक मार्गाने होऊन परत स्मृती मंदिरात पोहोचले. पथसंचलन च्या वाटेत शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्ग 1 जून रोजी होणार संपणार आहे.