जनतेज न्युज

मुक्ता बर्वे आणि सह कलाकारांनी केली,वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा

प्रतिनिधी, मुंबई :  अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरी मध्ये नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाट्यगृहाच्या अवस्थेबद्दल बोलताना नाराजी व्यक्त करून थेट यापुढे नाट्यगृहाची अवस्था असेल तर  पुन्हा आपण रत्नागिरीत शो करणार नसल्याची खंत व्यक्त केली,त्यामुळे आता अनेक ठिकाणच्या नाट्यगृहांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे,अनेकांना मुंबई सह इतर ठिकाणी असलेली नाट्यगृहात सुविधांचा विकास याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.मात्र काल एका शो साठी नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आलेल्या अभिनेत्या मुक्ता बर्वे आणि त्यांच्या टीमने वाशी मधील या विष्णुदास नाट्यगृहाची तोंडभरून प्रशंसा केली,इथे आपल्याला मिळणाऱ्या सुविधा,येथील साऊंड सिस्टीम,मेकअप रूम,येथील प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली सुविधा,या सह अन्य सुविधा नवी मुंबई महानगर पालिकेने अत्यंत उत्तम दिल्याचे सांगून याबाबत त्यांनी थेट फेसबुक लाईव्ह करून नवी मुंबई महानगर पालिका आणि ज्यांनी अनेक वर्ष ज्यांच्या हातात पालिका येथील नागरीकांनी दिली त्या आमदार गणेश नाईक यांचे आभार मानले,यावेळी त्यांनी नवी मुंबईतील या नाट्यगृहाचे अनेकांनी आदर्श घ्यावे आणि आणि नाट्यगृह कसे असते याबाबत इतर पालिका आणि संबधित विभागाने याचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी या सर्व कलाकारांनी मांडले.