प्रतिनिधी, संभाजीनगर : दिल्ली येथे सुरू असलेल्या कुस्तीगीरांच्या उपोषणाला आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने क्रांती चौक येथे आंदोलनाच्या माध्यमातून समर्थन देण्यात आले. “महिला कुस्तीगीरांच्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण सिंग यांचा निषेध यावेळी करण्यात आला. आणि त्यांनी तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
