जनतेज न्युज

संगमनेर तालुक्यातील काकडवाडीत कपड्यांची आहेर प्रथा बंद; ग्रामस्थांचा निर्णय

प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी याठिकाणी आयोजित महत्वाच्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी चर्चा केली. ती म्हणजे वेगवेगळ्या समारंभामध्ये कपड्यांच्या स्वरूपात आहेर भेट देण्याची प्रथा आपल्याकडे काळानुरूप रुढ आहे. ती प्रथा बंद करून रोख रक्कमाचा आहेर देण्याची संकल्पना काही नागरिकांनी मांडली. ग्रामस्थांनी देखील यांस सहमती दर्शवली आहे. ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या गंगापूजन, वास्तूशांती व जागरण गोंधळाच्या कार्यक्रमापासून या कपड्यांचा आहेर स्वीकारण्याच्या प्रथेला पायाबंद घालण्यात आला आहे. रोखीने रक्कम स्वरूपात आहेर स्विकारण्याची प्रथा चालू करण्यात आली आहे. कपड्यांच्या आहेरामध्ये टोपी-टावेल, शाल इतर वापरण्याचे कपडे भेट दिली जातात. मात्र हे कपडे कायम वापरात येत नसल्याने एकमेकांना त्याची पुनः देवाण-घेवाण होत असल्या कारणाने तसेच मोठ्या प्रमाणात जमा झालेले कपडे तसेच घरात पडून राहतात. त्यामुळे कपड्यांच्या आहेरावर खर्च करण्यापेक्षा सदर कुटुंबाला आर्थिक स्वरूपात हातभार लागावा म्हणून रोख रक्कम स्वरूपात आहेराची प्रथा पुन्हा सुरू करण्यात आल्याने या निर्णयाचे ग्रामस्थांनी देखील स्वागत केले आहे. इतरांनी देखील असे उपक्रम चालू करणे गरजेचे आहे. याप्रसंगी बोलताना काकडवाडी गावचे उपसरपंच जनार्दन कासार, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप शिरसाठ, तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.