जनतेज न्युज

शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे फटाके फोडून स्वागत

प्रतिनिधी, जालना : मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाईचे जिल्हयातील १९ महसूल मंडळातील शेकडो गावांचे अनुदान वगळले गेले होते. या मंडळातील शेतकऱ्यांचे फळबाग व खरीप पिकांचे नुकसान होऊनही शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाला हजारो शेतकरी मुकले जात होते.  याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाज उठवून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच राज्य सरकार यांना निवेदने दिली. वेळोवेळी पाठपुरावा करून, धरणे आंदोलन, रास्ता रोको, जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन केले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी राज्य सरकारने सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या भरपाईपोटी १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.