जनतेज न्युज

पंढरपुरात शिंदे फडणवीस सरकारचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

प्रतिनिधी, पंढपुर : आळंदी येथे झालेल्या वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज निषेधार्थ पंढरपुरातील महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला व वारकऱ्यांना तुळशीची माळ गळ्यात घालून सन्मान करण्यात आला. जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देवेंद्र फडवणीस वारकऱ्यांची माफी मागणार नसतील तर येणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.