जनतेज न्युज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा सरकारवर निशाणा

प्रतिनिधी, कोहलपुर : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शासनाच्या योजनांबाबत हा कार्यक्रम घेण्यात येणार असून याला लोक चळवळ प्राप्त होण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. शासन आपल्या दारी हा उपक्रम चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या उसाच्या दराचे काय झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला आहे.