जनतेज न्युज

खा. डॉ. हिना गावित यांनी नरेंद्र मोदी सरकारचा 9 वर्षाचा मांडला लेखाजोखा

प्रतिनिधी, नंदुरबार : नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले असून या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विकासाचा लेखाजोखा केंद्रीय मंत्र्यांकडून मांडला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात  केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला असून त्यामुळे नंदुरबारच्या विकासाला एक दिशा मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे महा जनसंपर्क अभियान अंतर्गत आज नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या  प्रयत्नाने नंदुरबार जिल्ह्यात 9 वर्षात केलेल्या कामाच्या लेखाजोखा आज पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे उपस…