प्रतिनिधी, नाशिक : वारकरी संप्रदायावर झालेला लाठी चार्ज तसेच राज्यात औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, संगमेनर सह अनेक ठिकाणी दंगल झाल्याने या दंगली रोखण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आपण काय सांगाल असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांना येवला येथे विणकारांच्या मेळाव्याला आले असता याप्रसंगी विचारला गेला ते बोलताना म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण केल्यास त्या विरोधात महाराष्ट्र सरकार कठोर कारवाई करेल तसेच वारकरी संप्रदायावर पोलिसांकडून झालेला लाठी चार्ज काही गैरसमजा मधून झाला असावा, मात्र हा झालेला लाठी चार्ज अयोग्य असून याबाबत संपूर्ण अहवाल आल्यानंतरच मी यावर बोलेन असे कैलास विजयवर्गीय म्हणाले आहेत.
