प्रतिनिधी, कोहलपुर : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता राज्यातील प्रथमच मोठा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे पार पडणार आहे. राज्यातील 75 हजार शेतकऱ्यांना शासन योजनेचे लाभ देणारे सर्टिफिकेट या ठिकाणी दिले जाणार आहे. उद्याच्या कार्यक्रमाला राज्यभरातून दोन ते तीन लाख नागरिक उपस्थित राहणार असून त्याची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
