प्रतिनिधी, मुंबई : मराठा वनवास यात्रा यांचे भायखळा येथे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांना पकडुन आझाद मैदान येथे आणले. आंदोलन कर्त्यांवर पोलिसांकडुन मारहाण झाल्याचे समोर आले. आझाद मैदान येथे आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा केल्याबद्दल पुन्हा मारहाण केली. आझाद मैदानात जे आंदोलन करतात आणि त्यांचे सरकारविरोधात घोषणाबाजी असतात. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी आमची मागणी न ऐकताच मारहाण केली. आम्हाला ज्या घोषणा द्यायच्या तो आमचा सर्वाधिक आणि स्वतंत्र निर्णय आहे. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण या घोषणा दिल्या म्हणून भूषण बेळणेकर या पोलिस अधिकाऱ्याने दडपशाही केली. या भूषण बेळणेकर यांनी आपल्या बांधवांचे मोबाईल देखील काढून घेतले. या मुजोर पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. हीच मराठा समाजाच्या वतीने मागणी. यांची नेमकी जात कोणती आहे? याच्याशी आपल्याला घेणे देणे नाही. पण ही मराठा विरोधी मानसिकता आधी ठेचली पाहिजे.
